Thursday, October 17, 2019

सोन्‍याची कुदळ


कल्की नावाचा एक शेतकरी होता ज्याला राम आणि श्याम अशी दोन मुले होती एक दिवस त्याने मुलांना बोलावले आणि सांगितले आता माझे आता वय झाले आहे त्यामुळे चारधाम करायची माझी इच्छा आहे त्या आधी माझ्या कडे एक सोन्याची कुदळ तुम्ही ती जेवढी वापराल तेवढे सोने निघेल आणि आणि दुसरीकडे सगळी धन-संपत्ती आहे तुम्ही ठरवा कुणाला काय पाहिजे राम विचार करतो कि कुदळ घेऊन मी काय करू त्यापेक्षा मी धन-संपत्ती घेतो आणि श्याम विचार करतो की कष्टाळू आहे त्यामुळे मी कुदळ घेतो दोघांचे एकमत होते आणि कल्की दोघांचा निरोप घेऊन चारधामला निघून जातो

राम त्याच्या कडचा पैसा पाण्‍यासारखा खर्च करायला सुरुवात करतो आणि काही काळातच गरीब होतो दुसरी कडे श्याम शेती करायला सुरुवात करतो ती कुदळ काही सोन्याची होत नाही पण त्याला त्याच्या कष्टावर विश्वास असतो आणि त्या वर्षी त्याची शेती खूप चांगली होते गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला त्यानंतर त्याला वडिलांच्या बोलण्याचा अर्थ कळतो की कष्टाचे सोने होते

तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते.

No comments:

Post a Comment