Thursday, October 17, 2019

झोपडी


मध्य प्रदेशातील इंदोर गावात एक कल्की नावाचा व्यापारी राहत होता त्याचा धंदा खूप उत्तम चालला होता त्याने एक खानावळ चालू केली होती त्याच्या खाणावळाची ख्याती ऐकून खूप लांबून लांबून लोक येत होती एकदा इंदोर मध्ये काही लोक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येतात कार्यक्रम संपल्यानंतर तो त्यांना जेवण्यासाठी निमंत्रण देतो त्यांना अपेक्षा असते की तो त्यांना त्याच्या प्रसिद्ध खानावळीत खाऊ घालेल पण तो त्यांना एका झोपडीत घेऊन जातो.

तिथे तो त्यांना स्वतः वाढतो आणि ते सुद्धा खूप मनसोक्त जेवतात त्याची जशी ख्याती होती तसेच  जेवण खूप चविस्ट असते पण सगळ्यांना एकाच प्रश्न पडलेला असतो की त्याने झोपडीत का नेले. एक जण त्याला विचारतो तेंव्हा तो उत्तर देतो जेंव्हा मी या गावात आलो तेंव्हा माझ्या जवळ राहायला जागा नव्हती खायला पैसे नव्हते आम्ही खूप कष्ठातून हा व्यवसाय चालू केला तेंव्हा आमच्या सुख दुःखात ह्या झोपडीने आम्हाला साथ दिली हिचे खूप उपकार आहेत आमच्यावर त्यामुळे जेंव्हा कधीपण खूप चांगला क्षण असेल तो आम्ही तेथे साजरा करतो 

तात्पर्य - आपण आपल्या मूळ गोष्टीना विसरू नये. ज्यांनी संकटकाळात आपली मदत केली त्यांना कधीच विसरू नये.

No comments:

Post a Comment