पुराणकाळात एक राजा होता कल्की त्याची ख्याती चारी दिशांना पसरत होती एक दिवस विष्णू आणि लक्ष्मी त्याची परीक्षा घ्यायची ठरवतात तो एक दिवस सकाळी उठतो आणि एका सुंदर स्त्रीला बाहेर जाताना बघतो तो तिला विचारतो आपण कोण आहात? ती स्त्री म्हणते मी लक्ष्मी आहे कल्की तिला जाण्याची परवानगी देतो मग दुसरा पुरुष बाहेर जाताना बघतो तो त्याला विचारतो आपण कोण आहात?
तो म्हणतो मी कुबेर आहे कल्की त्याला पण जाण्याची परवानगी देतो मग त्याला तिसरा पुरुष बाहेर जाताना बघतो तो त्याला पण विचारतो आपण कोण आहात? तो उत्तर देतो मी न्याय आहे कल्की त्याला पण जाण्याची परवानगी देतो त्याला मग चौथा परुष बाहेर जाताना दिसतो तो त्याला पण विचारतो आपण कोण आहात? तो म्हणतो मी विनम्र आहे कल्की त्याला म्हणतो मी इतक्या वर्षात जे काही कमावले ते माझ्याकडे तू होतास म्हणून त्यामुळे मी तुला विनंती करतो को तू इथेच रहा विनम्र तिथेच थांबतो ते बघून बाहेर गेलेले लक्ष्मी, कुबेर आणि न्याय परत येतात आणि तो परीक्षेत यशस्वी ठरतो
तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे
No comments:
Post a Comment