Wednesday, October 16, 2019

मैञी


एक खेकडा समुद्राच्या काठी खूप आनंदाने चालत होता चालताना त्याच्या पायाचे ठसे उमटत होते ते बघताना त्याला खूप आनंद होत होता तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि त्याचे पायाचे सगळे ठसे मिटवून टाकते ते पाहून तो खूप दुःखी होतो आणि लाटेला म्हणतो मी तुला तर खूप चांगली मैत्रीण समाजात होतो मग तू असे का केले त्यावर लाट म्हणते मागे एक मासेमार तुझ्या ठस्यांचा मागोवा घेत तुझा पाठलाग करत आहे ते मी पहिले आणि तुझे सगळे ठसे मी बुजवून टाकले

तात्‍पर्य: मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

No comments:

Post a Comment