Wednesday, October 16, 2019

देवाचा मित्र


एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलाला एक चप्पल विकत घेऊन भेट दिली. मुलगा लहान होता. त्याला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले तो आनंदी झाला आणि म्हणाला, "काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्‍नावर तो सज्जन गृहस्थ म्हणाला, "अरे नाही रे बाळा, मी देव नाही" मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, "काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार. मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार" हे वाक्‍य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

तात्पर्य : ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव ओळखायला शिका

No comments:

Post a Comment