Wednesday, October 16, 2019

बेडकाची परीक्षा


एका बेडकाची पाण्यात परीक्षा घ्यायचे ठरवतात बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले अपेक्षा होती की पाण्याचे तापमान वाढल्यावर बेडूक उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले आतातरी अपेक्षा होती की बेडूक उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले पण तसे काही घडेना शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला. तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला.

पण तसे नव्हते बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते त्यामुळे पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान कमी-जास्त करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे  पाण्याचे तापमान जसजसे वाढत होते बेडूक त्याच्या शरीराचे तापमान वाढवण्यात ताकद लावत होता एका तापमानानंतर त्याची सगळी शक्ती संपली म्हणजे त्याने बाहेर उडी मारून येण्याची ताकद पण वापरून टाकली त्यामुळे उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही आणि तो मरण पावला

तात्पर्य:- तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे.

No comments:

Post a Comment