Tuesday, October 22, 2019

एक काळ


एक राजा असतो त्याला चांगल्या जातीचे घोडे पाळण्याचा खूप शौक असतो त्याचा कडे एक खूप सुंदर आणि रुबाबदार घोडा असतो राजा त्याचे खूप लाड करत असतो पण काही दिवसांनी तो दुसरा घोडा घेऊन येतो आणि पहिल्या घोड्या पेक्षा त्याचे जास्त लाड करायला लागतो त्यावर एक दिवस नवा घोडा जुन्या घोड्याला विचारतो मित्रा राजा दही तुझे लाड करायचा असे मी ऐकले आहि आजकाल तो माझे कड करतो असे का ? त्यावर जुना घोडा म्हणतो प्रत्येकाचा एक काळ असतो आणि प्रत्येकाला एक संधी मिळत असते

तात्पर्यः प्रत्येकाचा एक काळ असतो

Thursday, October 17, 2019

सकारात्मक दृष्टिकोन


एकदा एका गावात दोन मैत्रिणी राहत असतात त्यांना राम आणि श्याम नावाची मुले असतात राम आणि श्याम दोघे चांगले मित्र असतात एक दिवस राम आणि श्याम दोघे एक दिवस पैज लावतात झाडावर कोण जास्त वर जाऊ शकतो दोघे खूप वर जातात पण तेवढयात जोराचे वादळ चालू होते दोघे वर अडकून बसतात तेवढ्यात दोघांच्या आया तिथे येतात रामची आई म्हणते फांदीला घट्ट पकडून बस्स आणि श्यामची  आई म्हणते घाबरू नकोस हळू हळू खाली उतर थोड्या वेळाने राम घसरून पडतो आणि श्याम हळू हळू खाली उतरतो रामच्या आईच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ऐकली आणि तो पडला.या उलट श्यामच्या आईने उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ऐकली

ताप्तर्य: "वास्तु करी तथास्तु" वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते त्यामुळे तुम्ही जसे बोलाल तसेच होते तुम्ही जर सकारात्मक बोलला तर सकारात्मक आणि नकारात्मक बोलला तर सकारात्मक घडते

कबूतर आणि मुंगी


एक दिवस कबूतर आणि मुंगी मध्ये बोलणे चालू असताना अचानक ते संवाद एकदम विवादामध्ये रूपांतरित होतो कबूतर म्हणतो जर मी मागच्या वेळेस तुला वाचवले म्हणून तर आज तू जिवंत आहेस त्यावर मुंगी म्हणते त्याची  परतफेड मी तुझा जीव वाचवून केली होती असाच वाद वाढत जातो आणि परत तोच प्रसंग येतो परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली पण कबुतराचा अहंकार आड येतो तो म्हणतो यावेळेस मी मुंनीला वाचवणार बघू माझ्या शिवाय ती जीव वाचवू शकते का थाड वेळ प्रयत्न करून मुंगी जीव सोडते तो पर्यंत तिथे पारधी आलेला असतो तो संधीचा फायदा उचलतो आणि कबुतराला मारून टाकतो तिटकाढे झाड हे सागर बगत असते त्याला कबुतर मेल्याचं दुःख होतंच पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं

ताप्तर्य : अहंकार सद्सदबुद्धीचा नाश करते

विनम्र

पुराणकाळात एक राजा होता कल्की त्याची ख्याती चारी दिशांना पसरत होती एक दिवस विष्णू आणि लक्ष्मी त्याची परीक्षा घ्यायची ठरवतात तो एक दिवस सकाळी उठतो आणि एका सुंदर स्त्रीला बाहेर जाताना बघतो तो तिला विचारतो आपण कोण आहात? ती स्त्री म्हणते मी लक्ष्मी आहे कल्की तिला जाण्याची परवानगी देतो मग दुसरा पुरुष बाहेर जाताना बघतो तो त्याला विचारतो आपण कोण आहात?

तो म्हणतो मी कुबेर आहे कल्की त्याला पण जाण्याची परवानगी देतो मग त्याला तिसरा पुरुष बाहेर जाताना बघतो तो त्याला पण विचारतो आपण कोण आहात? तो उत्तर देतो मी न्याय आहे कल्की त्याला पण जाण्याची परवानगी देतो त्याला मग चौथा परुष बाहेर जाताना दिसतो तो त्याला पण विचारतो आपण कोण आहात?  तो म्हणतो मी विनम्र आहे कल्की त्याला म्हणतो मी इतक्या वर्षात जे काही कमावले ते माझ्याकडे तू होतास म्हणून त्यामुळे मी तुला विनंती करतो को तू इथेच रहा विनम्र तिथेच थांबतो ते बघून बाहेर गेलेले लक्ष्मी, कुबेर आणि न्याय परत येतात आणि तो परीक्षेत यशस्वी ठरतो

तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे

झोपडी


मध्य प्रदेशातील इंदोर गावात एक कल्की नावाचा व्यापारी राहत होता त्याचा धंदा खूप उत्तम चालला होता त्याने एक खानावळ चालू केली होती त्याच्या खाणावळाची ख्याती ऐकून खूप लांबून लांबून लोक येत होती एकदा इंदोर मध्ये काही लोक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येतात कार्यक्रम संपल्यानंतर तो त्यांना जेवण्यासाठी निमंत्रण देतो त्यांना अपेक्षा असते की तो त्यांना त्याच्या प्रसिद्ध खानावळीत खाऊ घालेल पण तो त्यांना एका झोपडीत घेऊन जातो.

तिथे तो त्यांना स्वतः वाढतो आणि ते सुद्धा खूप मनसोक्त जेवतात त्याची जशी ख्याती होती तसेच  जेवण खूप चविस्ट असते पण सगळ्यांना एकाच प्रश्न पडलेला असतो की त्याने झोपडीत का नेले. एक जण त्याला विचारतो तेंव्हा तो उत्तर देतो जेंव्हा मी या गावात आलो तेंव्हा माझ्या जवळ राहायला जागा नव्हती खायला पैसे नव्हते आम्ही खूप कष्ठातून हा व्यवसाय चालू केला तेंव्हा आमच्या सुख दुःखात ह्या झोपडीने आम्हाला साथ दिली हिचे खूप उपकार आहेत आमच्यावर त्यामुळे जेंव्हा कधीपण खूप चांगला क्षण असेल तो आम्ही तेथे साजरा करतो 

तात्पर्य - आपण आपल्या मूळ गोष्टीना विसरू नये. ज्यांनी संकटकाळात आपली मदत केली त्यांना कधीच विसरू नये.

मैञी


एक खेकडा समुद्राच्या काठी खूप आनंदाने चालत होता चालताना त्याच्या पायाचे ठसे उमटत होते ते बघताना त्याला खूप आनंद होत होता तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि त्याचे पायाचे सगळे ठसे मिटवून टाकते ते पाहून तो खूप दुःखी होतो आणि लाटेला म्हणतो मी तुला तर खूप चांगली मैत्रीण समाजात होतो मग तू असे का केले त्यावर लाट म्हणते मागे एक मासेमार तुझ्या ठस्यांचा मागोवा घेत तुझा पाठलाग करत आहे ते मी पहिले आणि तुझे सगळे ठसे मी बुजवून टाकले

तात्‍पर्य: मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

सोन्‍याची कुदळ


कल्की नावाचा एक शेतकरी होता ज्याला राम आणि श्याम अशी दोन मुले होती एक दिवस त्याने मुलांना बोलावले आणि सांगितले आता माझे आता वय झाले आहे त्यामुळे चारधाम करायची माझी इच्छा आहे त्या आधी माझ्या कडे एक सोन्याची कुदळ तुम्ही ती जेवढी वापराल तेवढे सोने निघेल आणि आणि दुसरीकडे सगळी धन-संपत्ती आहे तुम्ही ठरवा कुणाला काय पाहिजे राम विचार करतो कि कुदळ घेऊन मी काय करू त्यापेक्षा मी धन-संपत्ती घेतो आणि श्याम विचार करतो की कष्टाळू आहे त्यामुळे मी कुदळ घेतो दोघांचे एकमत होते आणि कल्की दोघांचा निरोप घेऊन चारधामला निघून जातो

राम त्याच्या कडचा पैसा पाण्‍यासारखा खर्च करायला सुरुवात करतो आणि काही काळातच गरीब होतो दुसरी कडे श्याम शेती करायला सुरुवात करतो ती कुदळ काही सोन्याची होत नाही पण त्याला त्याच्या कष्टावर विश्वास असतो आणि त्या वर्षी त्याची शेती खूप चांगली होते गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला त्यानंतर त्याला वडिलांच्या बोलण्याचा अर्थ कळतो की कष्टाचे सोने होते

तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते.

कर्माचे फळ


एक शेठजी अत्यंत दयाळू होते. त्यांच्याकडे पैसे मागायलेल्या कुठल्याही व्यक्तीला ते पैसे देत असे भले तो परत करणार किंवा नाही शेठजी फक्त त्याला एवढेच विचारायचे तू पैसे या जन्मात परत करणार आहेस कि पुढच्या जन्मात ज्यांची पैसे परत करायची नियत नव्हती ते पुढच्या जन्मात सांगून मोकळे व्हायचे एकदा एक चोर शेठजींकडे पैसे मागण्यासाठी पोहोचला. शेठजीने त्यालाही तोच प्रश्न विचारला, पैसे परत कधी देणार या जन्मात की पुढच्या? चोर म्हणाला पुढील जन्मात. शेठजीने पैसे काढून त्याला दिले. शेठजीच्या तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे चोराने पाहिले. चोराने शेठजीच्या घरी चोरी करण्याची योजना आखली.

रात्री सर्वजण झोपल्यानंतर चोर शेठजीच्या घरात घुसला. चोर गायीच्या  गोठ्यात उभा राहून योग्य वेळेचे वाट पाहत होता, तेवढ्यात त्याच्या कानावर दोन्ही गायीचे बोलणे पडले. दोन गायी एकमेकींशी बोलत होत्या. एका गायीने दुसऱ्या गायीला विचारले तू आजच येथे आलीस का? दुसऱ्या गायीने उत्तर दिले हो, मी मागील जन्मात शेठजींकडून पैसे घेतले होते आणि ते आता फेडण्यासाठी आले आहे. तू केव्हापासून येथे आहेस? पहिल्या गायीने उत्तर दिले मला येथे पाच वर्ष झाले आहेत. मी शेठजींकडून कर्ज घेतले होते आणि पुढील जन्मात परत देईल असे सांगितले होते. शेठजींकडून कर्ज घेतल्यानंतर माझा मृत्यू झाला आणि मी गाय बनून येथे आले. आता दूध देऊन कर्ज फेडत आहे. जोपर्यंत कर्जाचे पूर्ण पैसे जमा होत नाहीत, मला येथेच राहावे लागेल. चोर दोन्ही गायीचे बोलणे ऐकून चकित झाला. त्याला काय करावे काही सुचेना. त्याच्या लक्षात आले की, कर्ज घेतल्यानंतर ते फेडावेच लागते मग ते या जन्मात किंवा पुढच्या जन्मात. दुसऱ्या दिवशी चोराने शेठजीचे पैसे परत केले आणि चोरी करणेही सोडून दिले.

तात्पर्य: कधीच इतरांचे वाईट करू नये आणि असे करण्याचा विचारही करू नये.

देवाचा मित्र


एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलाला एक चप्पल विकत घेऊन भेट दिली. मुलगा लहान होता. त्याला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले तो आनंदी झाला आणि म्हणाला, "काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्‍नावर तो सज्जन गृहस्थ म्हणाला, "अरे नाही रे बाळा, मी देव नाही" मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, "काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार. मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार" हे वाक्‍य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

तात्पर्य : ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव ओळखायला शिका

बेडकाची परीक्षा


एका बेडकाची पाण्यात परीक्षा घ्यायचे ठरवतात बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले अपेक्षा होती की पाण्याचे तापमान वाढल्यावर बेडूक उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले आतातरी अपेक्षा होती की बेडूक उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले पण तसे काही घडेना शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला. तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला.

पण तसे नव्हते बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते त्यामुळे पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान कमी-जास्त करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे  पाण्याचे तापमान जसजसे वाढत होते बेडूक त्याच्या शरीराचे तापमान वाढवण्यात ताकद लावत होता एका तापमानानंतर त्याची सगळी शक्ती संपली म्हणजे त्याने बाहेर उडी मारून येण्याची ताकद पण वापरून टाकली त्यामुळे उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही आणि तो मरण पावला

तात्पर्य:- तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे.

Wednesday, October 16, 2019

माणुसकी

कल्की नावाचा माणूस एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करत होता एक दिवस कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून कल्की बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करता करता खूप उशीर झाला त्याच्या लक्षात आले नाही की तोपर्यंत सगळे लाईट आणि दरवाजे बंद करून घरी गेले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते. कल्कीला काही सुचेनासं झालं, पण थोड्याच वेळात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. कंपनीच्या बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, "तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय." सुरक्षा रक्षक म्हणाला, "या कंपनीमध्ये तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येता जाताना नमस्कार करतात आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो."

तात्पर्य : माणुसकी कधी कामाला येईल सांगता येत नाही 

Tuesday, October 15, 2019

Life

Life is nothing but an unknown world and you have to survive into it
Sometimes you feel, you know it and sometimes you find yourself as stranger
But no one can guess what will happen in the next moment
Coz it is the unknown path in every moment in the unknown world


Life is nothing but a mirror and you have to see yourself into it

Sometimes it will show your beauty and sometimes it will show your ugliness
But don’t be egoist by your beauty and don’t be frustrate by your ugliness
Coz it will just show you how you want to see yourself into it


Life is nothing but a garden of emotions and you have to feel it

Sometimes you find nice smell of flowers and sometimes you will hate it
But try to get better things from it and leave the things, which you don’t like it
Coz it is just a matter of taste that can be change by person to person


Life is nothing but a share of sensations and you have to share it

Sometimes you will find the happiness and sometimes you will find sorrow
But try to enjoy the happiness and forget to sorrow
Coz they are nothing but the time being emotions, which are changes with the time,


Life is nothing but a moment and you have to live it

Sometimes it can be a tiny and sometimes it can be so big which never ends,
But it is all depends on how you look towards it
Coz it is just a moment, which you live in happiness and sorrow


Life is nothing but a game and you have to play game,

Sometimes you will win it and sometimes you will loose the game
But please don’t just play the game and please don’t take it lightly
Coz you to have to play the Game; to Win the Game, to Win the Game, to Win the Game ………..


Note : Please ignore the grammar mistake as I like its originality since I wrote it


उड्डान ( IBM poetry competition winning poem)



ऊपर  गगन  विशाल  और  मन  में  गगन  को  छुने की   चाहत  रखता  हूँ,
मेरी  मंजिल  है  बहुत  दूर  और  खुद्द  के  पंख   दुर्बल  पाता  हूँ,
पर  गगन  को  छुने  का  जीवन  में  एक  लक्ष  रखता  हूँ,
और  मै भी  मै  ही  हूँ , जो  कभी  जीवन  में  हर  नही  मानता हूँ,

एक  नए  इरादे  के  साथ  आकाश  में  उड्डान  करता  हूँ,
पर  पंख  दुर्बल  होने  के  कारन  फिर  से  जमीन  पर  गिरता  हूँ,
शरीर  से  छिन्न-भिन्न  और मन  से  घायल  हो  जाता  हूँ,
पर  गगन  को  छुने  की  चाहत  कम    होने  देता  हूँ,
और  मै भी  मै  ही  हूँ , जो  कभी  जीवन  में  हर  नही  मानता हूँ,

इसिलिये  हर बार  पहलेसे  ज्यादा  ऊँची  उड्डान  भरता  हूँ,
हर  बार  पहलेसे  ज्यादा  ऊंचाई  से  जमीन  पर  गिरता  हूँ
( पहलेसे ज्यादा  ऊंचाई  से  गिराने  के  कारन ) हर  बार पहलेसे ज्यादा  चोट  पाता  हूँ,
पर  मै भी  मै  ही  हूँ , जो  कभी  जीवन  में  हर  नही  मानता हूँ,
और फिर  से  एक  नई  प्रेरणा  भरकर  (एक  नए  इरादे  के  साथ)  आकाश  मे उड्डान करता  हूँ


आयुष्याचे काही क्षण

आयुष्य  कधी  उन्हाचे  चटके  तर  कधी  मायेची  सावली  देऊन  गेले,
कधी  गुलाबाचे  काटे  तर कधी  पाकल्यांची झालर देऊन गेले,
कधी  सप्तरंगी  इन्द्रधनुष्य  तर  कधी  आभाळाची सावट देऊन  गेले,
जगण्याची  मजा  कशी  जगण्यात  आहे  त्याची  शिकवण देऊन  गेले 
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्याचे काही  क्षण  हसू  तर  काही  क्षण  आसवे  देऊन  गेले,
कधी  वसंत कधी  शिशिर  तर  कधी  मातीचा  सुगंध  (आयुष्यात) दरवळून गेले,
क्षण  भंगुर  ते  सारे काही  क्षणात  विसरून  गेले,
पण  प्रतेक  वेळेस काही  नवीन (शिकवण) देऊन  गेले,
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्य  कधी  लख्ख  प्रकाश  तर  कधी  अंधारमय  होऊंन  गेले,
कधी  हळूवार  वा़ऱ्याचा झोका  तर  कधी  वादळी  रात्र  होऊंन  गेले,
रात्र  वादळी  होती  पण  लढणयाची ताकद  मला  देऊन  गेले,
नवीन  जगण्याची  आशा  मला  देऊन  गेले,

आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले......आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले

प्रेम



प्रेम  हा  शब्द  उच्चारल्या बरोबर आपल्या  डोक्यात  बऱ्याच  गोष्टी  येऊन  जातात . बऱ्याच  गोष्टी  आपल्या  डोळ्या  समोरून  फिरायला  लागतात , प्रत्येक  जण  आपल्या  परीने  त्याची  व्याख्या  करतात प्रत्येकासाठी   जरी  त्याची  व्याख्या जरी  वेगळी  असली  तरी  त्याची  भावना  सगळ्याची  सारखीच  असते . प्रेम  म्हंटल्यावर  आपल्या  डोळ्यासमोर  प्रथम  पहिले  प्रेम  येते . प्रेम  म्हणजे  काय  हे  आहे  हे  कोणी  सांगून  कळत  नाही  जशी  एखाद्या  पदार्थाची  चव  घेतल्या  शिवाय  त्याची  चव  कळत  नाही  तसेच  प्रेमाचे  आहे  त्याची  प्रचिती  येण्यासाठी  ते  करावेच  लागते  आणि  ते  किती  कठीण  असले  त्यात  कितीही  त्रास  असला  तरीही  ज्याने  प्रेम  केले  आहे  तो  एवढेच  म्हणेल  की  माणसाने  एकदा  तरी  आयुष्यात  प्रेम  केले  पाहिजे .

पहिले  प्रेम  हा  एक  संशोधनाचा  विषय  आहे . कारण  आपल्याला  पहिले  प्रेम  कधी  होईल  कुठे  होईल  कोणत्या  क्षणी  होईल  कुठे  होईल  कोणत्या  वयात  होईल  काही काही  सांगता  येत  नाही . पण  जेंव्हा  पण  हे  होते  याची  प्रचिती  यायला  लागते . कोणाला  काय  जाणवेल  हे  सांगता  नाही  पण  आयुष्य  बदलले  आहे  हे  त्याला  जाणवायला  लागते . त्याला  प्रियकराशी  बोलावेसे  वाटते , त्याच्या  जवळ  राहावेसे  वाटते .काही  जण  याला  प्रेम  म्हणतात  तर  काही  जण  वयाचा  दोष . कारण  जर  हे  प्रेम  जर  वयाच्या  15-16 वयात  झाले  तर  काही  लोक हा  वयाचा  दोष  म्हणतात . मला  फारसे  कळत  नाही  कारण  जेवढे  लोक  तेवढे  तर्क  आणि  तेवढ्या  वेगळ्या  गोष्टी .प्रत्येक  जण  आपल्या  अनुभवानुसार  आपल्या  प्रेमाची  व्याख्या करतात त्यामुळे  प्रेमाची  व्याख्या  निरनिराळ्या  लोक  कडून  वेगळी  ऐकायला  मिळे  पण  खरे  एवढेच  आहे  ही   जरी  शब्द  वेगळे  असते  तरी  प्रत्येकाची  भावना  एकाच  असते

प्रेम  हे  जीवनात  एकदाच  होते  का  हा  मला  पडलेला  प्रश्न . कारण  ज्याचे  पहिले  प्रेम  यशस्वी  झाले  तर  तो  दुसरी  कडे  वळले  नाही  पण  ज्याचे  प्रेम  अयशस्वी  होते  त्याला  फार  वाईट  वाटते काही  लोक  त्या  वाटे  वरून   परत  चालायचेच  नको  म्हणून  परत  त्याच्या  कडे  पाठ  फिरवतात  पण  काही  लोक  परत  आपले  आयुष्य  नव्याने  चालू  करतात . अशावेळी  ते  परत  नवीन  जोडीदाराच्या  शोधात   असतात . काही  जणांना  परत  नवीन  जोडीदार  मिळतोही  काही  जणांना  वाटते  की  हे  प्रम  पहिल्या  पेक्षा  खरे  आहे  आणि  ते  परत  नव्याने  आयुष्य  चालू  करतात . पण  मला  हा  प्रश्न  पडतो  की   खरंच  ते  प्रेम  असते  का  ती  तडजोड  असते  कारण  आपल्याला  नवीन   आयुष्य  चालू  करायचे  असते . काही  जणांना  त्या  प्रेमाची  जास्त  जवळीक  वाटते  कारण  कदाचित  काही  जणांचे  दुसरे  प्रेम  यशस्वी  होते  पण  काही  जणांचे  ते  पण  अयशस्वी  होते . मग  काय  करावे  हा  बऱ्याच  जनावर  प्रश्न  पडतो . काही  जण  त्यातून  पण  परत  सहीसलामत बाहेर येतात आणि  नव्याने  आयुष्य  चालू  करतात . मी  इथे  फक्त  त्या  लोकसाठी  बोलतो  आहे  जे  लोक  जीवनकडे  पॉसिटीव्ह  दृष्टीने  बघतात  म्हणजे  जरी  त्यांचे  पहिले  किंवा  दुसरे  प्रेम  अयशस्वी  झाले  तरी  ते  परत  नव्याने  आयुष्य  चालू  करण्या  मध्ये  विश्वास  ठेवतात .

मला  वाटते कि  खरे  प्रेम  हेच  आहे  कि  जे  यशस्वी  होऊ  ना होऊ  ते  नवीन  जगायला  प्रेरणा  देते . ते  आपल्याला  जे  अनुभव  येतात  ये  चांगले  पण  असतात  आणि  वाईट  पण  असतात.  पण  प्रेम  हे  आपल्याला  चांगले  घेऊन  वाईट  विसरायला  मदत  करते . आयुष्यकडे नवीन दृष्टीने बघायला शिकवते ते आपल्या भाग्याला दोष देत बसत नाही ते जे मिळेल त्या कडे पॉसिटीव्ह दृष्टीने बघून आपले नवीन आयुष्य जगायला लागतात. त्यामुळे  जो  जीवन  कडे  पॉसिटीव्ह दृष्टीने  बघतो  मला  वाटते  तो   खरंच  प्रेम  करण्याची ताकद  पण  ठेवतो  आणि  दुसऱ्यासाठी  आदर्श  पण  निर्माण  करतो .
                        
                     आयुष्याचे  काही  क्षण

आयुष्य  कधी  उन्हाचे  चटके  तर  कधी  मायेची  सावली  देऊन  गेले,
कधी  गुलाबाचे  काटे  तर कधी  पाकल्यांची झालर देऊन गेले,
कधी  सप्तरंगी  इन्द्रधनुष्य  तर  कधी  आभाळाची सावट देऊन  गेले,
जगण्याची  मजा  कशी  जगण्यात  आहे  त्याची  शिकवण देऊन  गेले 
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्याचे काही  क्षण  हसू  तर  काही  क्षण  आसवे  देऊन  गेले,
कधी  वसंत कधी  शिशिर  तर  कधी  मातीचा  सुगंध  (आयुष्यात) दरवळून गेले,
क्षण  भंगुर  ते  सारे काही  क्षणात  विसरून  गेले,
पण  प्रतेक  वेळेस काही  नवीन (शिकवण) देऊन  गेले,
आयुष्य  जगायाचे  मला  शिकवून  गेले

आयुष्य  कधी  लख्ख  प्रकाश  तर  कधी  अंधारमय  होऊंन  गेले,
कधी  हळूवार  वा़ऱ्याचा झोका  तर  कधी  वादळी  रात्र  होऊंन  गेले,
रात्र  वादळी  होती  पण  लढणयाची ताकद  मला  देऊन  गेले,
नवीन  जगण्याची  आशा  मला  देऊन  गेले,

आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले......आयुष्य मला जगायाचे  शिकवून  गेले