एकदा एका जंगलात तीन झाडे होती. हे तिघेही त्यांच्या आनंद, दु: ख आणि स्वप्नांबद्दल एकमेकांशी बोलत असत. एक दिवस पहिले झाड म्हणाले "मला दागिन्यांची खूप मोठी पेटी व्हायचे आहे" दुसरे झाड म्हणाले "मला एक मोठे जहाज बनायचे आहे” शेवटी तिसरा झाड म्हणाले "मला या जंगलातील सर्वात उंच आणि सर्वात मोठा वृक्ष व्हायचा आहे." एक दिवस त्या जंगलात ३ वुडकटर येतात आणि तिन्ही झाडांना कापून नेतात
पहिले झाड सुतार खरेदी करून त्यापासून गुरांसाठी फीड फीडर बनवतो त्या बिचाऱ्या झाडाला याची कल्पनाही नव्हती. दुसरे झाडापासून लहान मासेमारी नौका बनवितात. दुसऱ्या झाडाचे पण स्वप्न चिरडले जाते. तिसऱ्या झाडाचे पण मोठे मोठे तुकडे करून एका काळ्या कोठीत बंद करतात
एके दिवशी एक माणूस त्या सुताराकडे येतो त्याची बायको एका मुलाला जन्म देते त्या फीड फीडर पासून त्या बाळासाठी पाळणा बनवतात पहिल्या झाडाला आपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते काही वर्षांनंतर काही तरुणांनी दुसर्या झाडापासून बनवलेल्या नावेत मासेमारी करण्यासाठी नेतात आणि तेथे अचानक वादळ येते आणि नावेतील सगळ्या लोकांना वाटते आता कोणीही जगात नाही पण त्यातला एक तरुण उठतो आणि वादळाला शांत होण्यासाठी आदेश देतो आणि वादळ शांत होते दुसऱ्या झाडाला आपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते तिसऱ्या झाडावर एका जखमी माणसाला बांधून त्याच्या दिनही हातावर खिळे ठोकून एका डोंगरावर नेतात तिथे त्या झाडाला स्वर्गाची अनुभूती होते आणि नंतर त्याला कळते तो माणूस येशू असतो तिसऱ्या झाडालाआपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते
निष्कर्ष: - जे काही होते ते चांगल्यासाठीच होते
No comments:
Post a Comment