Sunday, September 29, 2019

धन, यश आणि प्रेम


संध्याकाळी महिलेचा पती आणि मुलगी घरी आले. महिलेने पतीला दुपारी घरी घडलेला प्रसंग सांगितला. पतीनेही साधूंना जेवणासाठी बोलावण्यास होकार दिला. त्यानंतर महिला तिन्ही साधूंना बोलावण्यासाठी गेली. साधू म्हणाले आणि तिघेही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत. महिलेने विचारले असे का महाराज? साधू म्हणाले आमची नावे धन, यश आणि प्रेम अशी आहेत. तुम्ही तुमच्या पतीला विचारून यावे की, आमच्या तिघांपैकी ते कोणाला घरी बोलावण्यास इच्छुक आहेत. महिला पुन्हा घरी आली आणि पतीला सर्व गोष्ट सांगितली.

तो म्हणाला आपण जर धनाला घरी बोलावले तर आपण धनवान होऊ ती म्हणाली आपण जर यशला घरी बोलावले तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपली गरिबी दूर होईल. तेवढ्यात या दोघांची मुलगी म्हणाली आपण जर प्रेमला घरी बोलावले पाहिजे. प्रेमापेक्षा मोठे या जगात काहीच नाही. पती-पत्नीने मुलीचा सल्ला मान्य केला. महिला साधुंकडे गेली आणि प्रेमला घरी जेवणासाठी आमंत्रण दिले. त्यानंतर प्रेम नावाचे साधू महिलेसोबत घरात येऊ लागले आणि त्यांच्या मागे दोन साधुही निघाले. महिला म्हणाली, महाराज तुम्ही तर म्हणाला होतात की आम्ही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत मग आता एकत्र का येत आहात? साधू म्हणाले, जर तुम्ही धन किंवा यश या दोघांपैकी एकाला बोलावले असते तर तुमच्या घरी एकच साधू आले असते. परंतु तुम्ही प्रेमला आमंत्रण दिले आहे. जेथे प्रेम असते तेथे धन आणि यश आपोआप येतात.

ताप्तर्य : ज्या घरामध्ये प्रेम राहते तेथे सुख, शांती आणि संपन्नता राहते

No comments:

Post a Comment