Sunday, September 29, 2019

पोस्टमन - 2


एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. त्याच गावात एक दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी राहत होती असेच अधून मधून तिची पत्र यायची तिला दार उघडायला वेळ लागला तरी पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

इतर दिवाळीसारखे पोस्टमनने गावात इतरांकडे बक्षिशी मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण बॉक्स घरी जाऊन उघडा त्याने घरी जाऊन पहिले तर त्यात सुंदर चप्पला होत्या आणि त्या त्याने घालून पहिल्या तर त्या बरोबर त्याच्या मापाच्या होत्या ते पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

ताप्तर्य : नाती ही भावनेतून फुलतात

No comments:

Post a Comment