Saturday, September 28, 2019

स्वप्न - मर्सिडिस कार

कल्की हा त्याच्या संघर्षग्रस्त जीवनामुळे अतिशय निराश व्यक्ती आहे. जरी त्याच्यात इतरांपेक्षा जास्त क्षमता होती तरी तो जीवनात लहान लहान गोष्टींसाठी संघर्ष करीत असतो. त्याला वाटत असते की त्याच्या पेक्षा तुलनेने कमी क्षमतेचे लोक अधिक यशस्वी होतात पण त्याला मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याला वाटते की तो सध्याच्या आयुष्यापेक्षा अधिक चांगले जीवन जगण्यासाठी पात्र आहे म्हणून एक दिवस तो काही तज्ज्ञांच्या मदतीचा विचार करतो त्याला वाट असते की जेव्हा आपली गाडी बंद पडते तेव्हा आपण ती गॅरेजमध्ये घेऊन जातो, जेव्हा आपले आरोग्य समस्या निर्माण करते तेव्हा आपण डॉक्टर कडे जातो म्हणजे त्याला तज्ज्ञांच्या मदतीची आवश्यकता आहे. तो मदत शोधण्यास सुरुवात करतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो तज्ज्ञांच्या शोधात घर बाहेर पडतो.  तज्ज्ञांच्या शोधात असताना त्याला कळते की सोल्युशन बाबा नावाचा एक व्यक्ती आहे जो व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून तो सोल्यूशन बाबा कडे समस्या चे निराकरण करण्यासाठी जातो. तो त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तो त्याच्यात इतर यशस्वी लोकांच्या तुलनेत चांगली गुणवत्ता आणि क्षमता आहे म्हणून तो आतापेक्षा चांगल्या स्थितीत जीवन जगण्यास पात्र आहेत. सोल्यूशन बाबा काही काळासाठी विचार करातात आणि त्याला विचारतात की तुझ्या मते यशस्वी होणे म्हणजे काय आहे? कल्की त्यांना सांगतो की मर्सिडीझ कार हे यशस्वी व्यक्तीचे चिन्ह आहे. जेव्हा लोक एखाद्याला मर्सिडिजची कार मध्ये पाहतात तेव्हा लोक म्हणतात की तो एक यशस्वी व्यक्ती आहे. श्री सोल्यूशन बाबा त्याला सांगतात की आज पासून एका वर्षाच्या आत तुला मर्सिडीज मिळेल.

कल्की तो संवाद फारसा मनावर न घेता नेहमीप्रमाणे जीवन जगण्यास सुरवात करतो. काही दिवस निघून गेल्यावर कल्की च्या मनात सहज येते की माझ्या आयुष्यात किंवा आर्थिक स्थितीत काहीही बदल झालेला नाही त्यामुळे मी वर्षभरात मर्सिडीजची कार कशी मिळवू शकेन पण अचानक त्याने दुसरा विचार केला की जर काही चमत्कार घडला आणि जर त्याला संधी दिली की त्याच्या समोर असलेल्या कारमधून एक मर्सिडीजची गाडी निवड कर तर मला त्यातली सगळ्यात चांगली मर्सिडीझची कार कशी ओळखता येईल. मग मर्सिडीजच्या कारमध्ये कोणता कलर उत्कृष्ट दिसतो, कोणत्या प्रकारचे मॉडेल चांगले दिसते, त्यांच्या किमती काय आहे, इत्यादी. मर्सिडीजच्या कारचा अभ्यास करताना त्याला कळते की मर्सिडीज मध्ये वेगवेगळ्या श्रेणी आहेत उदा.  ए, बी, सी, डी, इ, इत्यादी मग तो विचार करतो की जर कधी आपल्या समोर काही मर्सिडीज मधून सर्वोत्तम निवडण्याची संधी मिळाली तर आपण कशी निवडू त्यासाठी मापदंड काय असतील मग त्या उपलब्ध पर्यायांमधून सर्वोत्कृष्ट प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये तो अजून खोलात जाऊन अभ्यास सुरू करतो.

अभ्यास करत असताना त्याला एक कल्पना सुचते की यातील वाहनाचा एक भाग जर मी बदलला तर गाडीचा खप वाढू शकेल तो ते संशोधन मर्सिडिज कारच्या व्यवस्थापनाकडे घेऊन जातो आणि मर्सिडिज कारचा संशोधन विभाग त्याचा अभ्यास करतात आणि त्यांना त्यात तथ्य सापडते त्यामुळे मर्सिडिज कारचे व्यवस्थापन त्याला बोलवून त्याचे कौतुक करतात आणि त्यांना संशोधन विभागाचे प्रमुख स्थान देऊन आणि त्यांना "मर्सिडीज कार" भेट देतात
.
तात्पर्य: मोठे स्वप्न बघा आणि त्यानुसार अंमलबजावणी करा

No comments:

Post a Comment