Monday, September 30, 2019

परीस


कल्की नावाचा एक माणूस परीस शोधायला निघतो परिसाची परीक्षा घेण्यासाठी तो रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा आणि गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला बरेच दिवस गेले महिने लोटले वर्षे सरली पण त्याच्या दिनक्रमात काही बदल झाला नाही त्याचा रोजचा कार्यक्रम झाला होता की दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा शेवटी कल्की आता म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपला शेवटचा श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले ती साखळी सोन्याची झाली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही कधी त्याच्या हातात परीस आला होता आणि त्यांनी तो दगड म्हणून फेकून दिला होता.

तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो त्याची किंमत करा

Sunday, September 29, 2019

पोस्टमन - 3


एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. त्याच गावात एक दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी राहत होती एक दिवस त्या मुलीने पोस्टमन अनवाणी पायाने आलेला पहिला आणि त्याला दिवाळीची भेट म्हणून सुंदर चप्पला दिल्या.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे"  साहेब म्हणाला,  "अरे आधीच तू कर्जाच्या ओझ्याने एवढा एकला आहे आणि पुन्हा आता पुन्हा कर्ज कशाला? पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत." साहेब म्हणाले  "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी? पोस्टमन म्हणाला "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे." साहेबासह सर्व स्टाफ स्तब्ध झाला

ताप्तर्य : चांगल्या कामाचे फळ नेहमीच मिळते

पोस्टमन - 2


एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. त्याच गावात एक दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी राहत होती असेच अधून मधून तिची पत्र यायची तिला दार उघडायला वेळ लागला तरी पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

इतर दिवाळीसारखे पोस्टमनने गावात इतरांकडे बक्षिशी मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण बॉक्स घरी जाऊन उघडा त्याने घरी जाऊन पहिले तर त्यात सुंदर चप्पला होत्या आणि त्या त्याने घालून पहिल्या तर त्या बरोबर त्याच्या मापाच्या होत्या ते पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

ताप्तर्य : नाती ही भावनेतून फुलतात

पोस्टमन - 1


एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन" आतून एका मुलीचा आवाज आला, "जरा थांबा, मी येतेय.." दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे.." आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते.." पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल." पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमनला धक्काच बसला दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

ताप्तर्य : कॊणत्याही निष्कर्षावर लगेच येऊ नका


सेवा


गंगेच्या काठी गौतम कृषींचा आश्रम होता. त्यांच्या जवळ ३ शिष्य होते प्रेम, श्याम, आणि कश्यप ते एक दिवस गौतम कृषीकडे जातात आणि विचारतात गुरुजी आम्ही तीघे ही तुमची सारखीच सेवा करतो पण आमच्यात सगळ्यात सर्वश्रेष्ठ शिष्य कोण आहे गौतम कृषी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे उत्तर द्यायचे सांगून त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोलावतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते येतात गौतम कृषी त्यांना पाण्याचा एक जादूची लोटी देतात ज्याचे पाणी कधीच संपत नसते ते त्याना सांगतात की तुम्ही गावात दुष्काळ पडला आहे त्यामुळे तुम्ही गावात जा आणि जास्तीत जास्त लोकांना पाणी देऊन या ते गुरुजींचा निरोप घेऊन जातात त्यातील प्रेम आणि श्याम विचार करतात की गावात जे काही लोक आहेत ते गावाच्या वेशे वरूनच आत जातील त्यामुळे आपण येथे बसूनच पाणी वाटप करू पण कश्यप गावात जाऊन जेवढे लोक मिळतील त्याना पाणी दिलेच पण घराघरात जाऊन पाणी वाटप केले ते तेघेही संघ्याकाळी परत येतात आणि गौतम कृषी कश्यपला सर्वश्रेष्ठ शिष्य जाहीर करतात

त्यावेळेस प्रेम आणि श्याम त्यांना विचारतात की आम्हीपण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कष्ट केले मग कश्यप सर्वश्रेष्ठ शिष्य कसा? त्यावर गौतम कृषी म्हणतात तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी देत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने घरोघरी जाऊन लोकांना जागेवर पाणी दिले त्यामुळे ते असत लोक पर्यंत पोचले आणि त्यामुळे त्याची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे

तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते.

यशोविजय पंडित

आजपासून तीन शतकांपूर्वी यशोविजय नावाचा एक विख्‍यात प्रकांड पंडित होऊन गेला. तो अनेक विषयांत निपुण होता. त्‍याच्‍या बाबतीत असे सांगण्‍यात येते की एकदा त्‍याला पंडीतांमार्फत एक विषय देण्‍यात आला होता. त्‍या विषयानुसार तो संस्‍कृतमध्‍ये बोलत राहिला. मात्र हळूहळू त्‍याला आपल्‍या पांडित्‍याचा गर्व होऊ लागला. व्‍याख्‍यानाच्‍यावेळी त्‍याच्‍या सांगण्‍यावरून त्‍याचे शिष्‍य चारही बाजूंनी झेंडे लावत असत. याचा अर्थ असा की, चारही दिशांमध्‍ये त्‍याचे नाव झाले आहे.

विद्वत्ता आणि सफलता याचे प्रदर्शन अन्‍य शिष्‍यांना योग्‍य वाटत नव्‍हते. पण त्‍याला विचारण्‍याचे कोणीच धाडस करत नव्‍हते. एकेदिवशी एका शिष्‍याने त्‍याला मोठ्या हुशारीने विचारले, ''गुरुदेव, आपले पांडित्‍य धन्‍य आहे, मी मोठा भाग्‍यवान आहे की आपल्‍यासारख्‍या महापुरुषाचे दर्शन मला झाले, आपल्‍या सत्‍संगाचा लाभ झाला. एक प्रश्‍न मला बरेच दिवसापासून पडतो आहे पण धाडस करून हे विचारतो की, आपण जर इतके विद्वान आहात तर आपले गुरु व गुरुंचे गुरु किती मोठे विद्वान होते?'' पंडीत म्‍हणाले,''मी तर त्‍या दोघांपुढे काहीच नाही. त्‍यांच्‍या चरणाच्‍या धुळीइतकेसुद्धा मला ज्ञान नाही'' शिष्‍य म्‍हणाला,'' ते इतके विद्वान होते तर तेसुद्धा आपल्‍यासारखेच चारी बाजूंना झेंडे लावत असत का?'' पंडीताला आपली चूक समजली व त्‍याचे हृदय अहंकाररहित झाले.

तात्‍पर्य: अहंकाराने बाधित ज्ञान सर्वनाशाला कारणीभूत ठरते. 

मानवता


जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. एक दिवस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट आणि दुसरेही संत आले होते त्यांना हिरेजडीत मुकुट देण्यात आला. हे पाहून त्या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले, ’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते.

जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह मध्ये इतका आनंदी होतो की मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही

तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.

व्‍यवहारज्ञानाचे धडे

एका शहरात दररोज संध्‍याकाळी एक महात्‍मा प्रवचन देत असे. त्‍यांची ख्‍याती एका धान्‍याच्‍या व्‍यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्‍या मुलासोबत प्रवचन ऐकण्‍यास आला. प्रवचन सुरु झाल्‍यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्‍या गोष्‍टी सां‍गत असताना ते म्‍हणाले,''या जगात जितके प्राणी आहेत. त्‍या सर्वांमध्‍ये आत्‍मा वावरत असतो.'' ही गोष्‍ट व्‍यापा-याच्‍या मुलाला हृदयस्‍पर्शी वाटली. त्‍याने मनोमन हा विचार आचरणात आणण्‍याचा संकल्‍प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्‍हा त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला काही वेळ दुकान सांभाळण्‍यास सांगितले. ते स्‍वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्‍य खाऊ लागली.


मुलाने त्‍या गायीला हाकलण्‍यासाठी लाकूड उचलले पण त्‍याच्‍या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्‍य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्‍यापारी तेथे आले त्‍याने गायीला धान्‍य खाताना पाहून मुलाला म्‍हणाले,'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्‍य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्‍यासारखा गप्‍प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्‍पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्‍हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्‍हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्‍ये पण एक जीव पाहिला'' तेव्‍हा व्‍यापारी म्‍हणाले,''मूर्खा, अध्‍यात्‍म आणि व्‍यापार यात गल्‍लत एकसारखे करायची नसते.''

तात्‍पर्य :- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्‍यास जीवन सुखदायी होते

धन, यश आणि प्रेम


संध्याकाळी महिलेचा पती आणि मुलगी घरी आले. महिलेने पतीला दुपारी घरी घडलेला प्रसंग सांगितला. पतीनेही साधूंना जेवणासाठी बोलावण्यास होकार दिला. त्यानंतर महिला तिन्ही साधूंना बोलावण्यासाठी गेली. साधू म्हणाले आणि तिघेही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत. महिलेने विचारले असे का महाराज? साधू म्हणाले आमची नावे धन, यश आणि प्रेम अशी आहेत. तुम्ही तुमच्या पतीला विचारून यावे की, आमच्या तिघांपैकी ते कोणाला घरी बोलावण्यास इच्छुक आहेत. महिला पुन्हा घरी आली आणि पतीला सर्व गोष्ट सांगितली.

तो म्हणाला आपण जर धनाला घरी बोलावले तर आपण धनवान होऊ ती म्हणाली आपण जर यशला घरी बोलावले तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपली गरिबी दूर होईल. तेवढ्यात या दोघांची मुलगी म्हणाली आपण जर प्रेमला घरी बोलावले पाहिजे. प्रेमापेक्षा मोठे या जगात काहीच नाही. पती-पत्नीने मुलीचा सल्ला मान्य केला. महिला साधुंकडे गेली आणि प्रेमला घरी जेवणासाठी आमंत्रण दिले. त्यानंतर प्रेम नावाचे साधू महिलेसोबत घरात येऊ लागले आणि त्यांच्या मागे दोन साधुही निघाले. महिला म्हणाली, महाराज तुम्ही तर म्हणाला होतात की आम्ही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत मग आता एकत्र का येत आहात? साधू म्हणाले, जर तुम्ही धन किंवा यश या दोघांपैकी एकाला बोलावले असते तर तुमच्या घरी एकच साधू आले असते. परंतु तुम्ही प्रेमला आमंत्रण दिले आहे. जेथे प्रेम असते तेथे धन आणि यश आपोआप येतात.

ताप्तर्य : ज्या घरामध्ये प्रेम राहते तेथे सुख, शांती आणि संपन्नता राहते

नेहमी पॉसिटीव्ह रहा

छोट्या बेटावर एकच माणूस जिवंत होता. त्याने रोज देवाला प्रार्थना केली की त्याला सोडविण्यासाठी कोणालातरी पाठवावे. दररोज त्याने देवाकडे मदत मागितली पण कोणीच येत नाहीत दरम्यान थकून . त्याने स्वत: चे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या काही वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी एक झोपडी बांधली एक दिवस तो अन्नाचा शोधून परत येत असताना त्याला त्याची झोपडी जळताना दिसते

सर्वात वाईट गोष्ट अशी होती की त्याच्या मालकीच्या सर्व वस्तू जळाल्या होत्या तो गोंधळलेला होता आणि देवावर चिडून त्याने देवाला विचारले, "तू असे का केलेस?" आणि तो वाळूवर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बेटाशेजारील बोटीचा आवाज ऐकू आला. ते सुटका करणारे होते. त्याने त्यांना विचारले की तो तेथे आहे हे त्यांना कसे समजले? बचावकर्त्यांनी त्याला सांगितले की त्यांनी धुराचा सिग्नल पहिला.

तात्पर्य   : आपल्या घडणार्‍या प्रत्येक नकारात्मक गोष्टींबद्दल आपण स्वतःला सांगावे, यात देवाला काहीतरी चांगले घडवायचे आहे

तीन झाडे


एकदा एका जंगलात तीन झाडे होती. हे तिघेही त्यांच्या आनंद, दु: ख आणि स्वप्नांबद्दल एकमेकांशी बोलत असत. एक दिवस पहिले झाड म्हणाले "मला दागिन्यांची खूप मोठी पेटी व्हायचे आहे" दुसरे झाड म्हणाले "मला एक मोठे जहाज बनायचे आहे” शेवटी तिसरा झाड म्हणाले "मला या जंगलातील सर्वात उंच आणि सर्वात मोठा वृक्ष व्हायचा आहे." एक दिवस त्या जंगलात ३ वुडकटर येतात आणि तिन्ही झाडांना कापून नेतात

पहिले झाड सुतार खरेदी करून त्यापासून गुरांसाठी फीड फीडर बनवतो त्या बिचाऱ्या झाडाला याची कल्पनाही नव्हती. दुसरे झाडापासून लहान मासेमारी नौका बनवितात. दुसऱ्या झाडाचे पण स्वप्न चिरडले जाते. तिसऱ्या झाडाचे पण मोठे मोठे तुकडे करून एका काळ्या कोठीत बंद करतात

एके दिवशी एक माणूस त्या सुताराकडे येतो त्याची बायको एका मुलाला जन्म देते त्या फीड फीडर पासून त्या बाळासाठी पाळणा बनवतात पहिल्या झाडाला आपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते काही वर्षांनंतर काही तरुणांनी दुसर्‍या झाडापासून बनवलेल्या नावेत मासेमारी करण्यासाठी नेतात आणि तेथे अचानक वादळ येते आणि नावेतील सगळ्या लोकांना वाटते आता कोणीही जगात नाही पण त्यातला एक तरुण उठतो आणि वादळाला शांत होण्यासाठी आदेश देतो आणि वादळ शांत होते  दुसऱ्या झाडाला आपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते तिसऱ्या झाडावर एका जखमी माणसाला बांधून त्याच्या दिनही हातावर खिळे ठोकून एका डोंगरावर नेतात तिथे त्या झाडाला स्वर्गाची अनुभूती होते आणि नंतर त्याला कळते तो माणूस येशू असतो तिसऱ्या झाडालाआपली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते

निष्कर्ष: -  जे काही होते ते चांगल्यासाठीच होते

Saturday, September 28, 2019

स्वप्न - मर्सिडिस कार

कल्की हा त्याच्या संघर्षग्रस्त जीवनामुळे अतिशय निराश व्यक्ती आहे. जरी त्याच्यात इतरांपेक्षा जास्त क्षमता होती तरी तो जीवनात लहान लहान गोष्टींसाठी संघर्ष करीत असतो. त्याला वाटत असते की त्याच्या पेक्षा तुलनेने कमी क्षमतेचे लोक अधिक यशस्वी होतात पण त्याला मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याला वाटते की तो सध्याच्या आयुष्यापेक्षा अधिक चांगले जीवन जगण्यासाठी पात्र आहे म्हणून एक दिवस तो काही तज्ज्ञांच्या मदतीचा विचार करतो त्याला वाट असते की जेव्हा आपली गाडी बंद पडते तेव्हा आपण ती गॅरेजमध्ये घेऊन जातो, जेव्हा आपले आरोग्य समस्या निर्माण करते तेव्हा आपण डॉक्टर कडे जातो म्हणजे त्याला तज्ज्ञांच्या मदतीची आवश्यकता आहे. तो मदत शोधण्यास सुरुवात करतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो तज्ज्ञांच्या शोधात घर बाहेर पडतो.  तज्ज्ञांच्या शोधात असताना त्याला कळते की सोल्युशन बाबा नावाचा एक व्यक्ती आहे जो व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून तो सोल्यूशन बाबा कडे समस्या चे निराकरण करण्यासाठी जातो. तो त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तो त्याच्यात इतर यशस्वी लोकांच्या तुलनेत चांगली गुणवत्ता आणि क्षमता आहे म्हणून तो आतापेक्षा चांगल्या स्थितीत जीवन जगण्यास पात्र आहेत. सोल्यूशन बाबा काही काळासाठी विचार करातात आणि त्याला विचारतात की तुझ्या मते यशस्वी होणे म्हणजे काय आहे? कल्की त्यांना सांगतो की मर्सिडीझ कार हे यशस्वी व्यक्तीचे चिन्ह आहे. जेव्हा लोक एखाद्याला मर्सिडिजची कार मध्ये पाहतात तेव्हा लोक म्हणतात की तो एक यशस्वी व्यक्ती आहे. श्री सोल्यूशन बाबा त्याला सांगतात की आज पासून एका वर्षाच्या आत तुला मर्सिडीज मिळेल.

कल्की तो संवाद फारसा मनावर न घेता नेहमीप्रमाणे जीवन जगण्यास सुरवात करतो. काही दिवस निघून गेल्यावर कल्की च्या मनात सहज येते की माझ्या आयुष्यात किंवा आर्थिक स्थितीत काहीही बदल झालेला नाही त्यामुळे मी वर्षभरात मर्सिडीजची कार कशी मिळवू शकेन पण अचानक त्याने दुसरा विचार केला की जर काही चमत्कार घडला आणि जर त्याला संधी दिली की त्याच्या समोर असलेल्या कारमधून एक मर्सिडीजची गाडी निवड कर तर मला त्यातली सगळ्यात चांगली मर्सिडीझची कार कशी ओळखता येईल. मग मर्सिडीजच्या कारमध्ये कोणता कलर उत्कृष्ट दिसतो, कोणत्या प्रकारचे मॉडेल चांगले दिसते, त्यांच्या किमती काय आहे, इत्यादी. मर्सिडीजच्या कारचा अभ्यास करताना त्याला कळते की मर्सिडीज मध्ये वेगवेगळ्या श्रेणी आहेत उदा.  ए, बी, सी, डी, इ, इत्यादी मग तो विचार करतो की जर कधी आपल्या समोर काही मर्सिडीज मधून सर्वोत्तम निवडण्याची संधी मिळाली तर आपण कशी निवडू त्यासाठी मापदंड काय असतील मग त्या उपलब्ध पर्यायांमधून सर्वोत्कृष्ट प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये तो अजून खोलात जाऊन अभ्यास सुरू करतो.

अभ्यास करत असताना त्याला एक कल्पना सुचते की यातील वाहनाचा एक भाग जर मी बदलला तर गाडीचा खप वाढू शकेल तो ते संशोधन मर्सिडिज कारच्या व्यवस्थापनाकडे घेऊन जातो आणि मर्सिडिज कारचा संशोधन विभाग त्याचा अभ्यास करतात आणि त्यांना त्यात तथ्य सापडते त्यामुळे मर्सिडिज कारचे व्यवस्थापन त्याला बोलवून त्याचे कौतुक करतात आणि त्यांना संशोधन विभागाचे प्रमुख स्थान देऊन आणि त्यांना "मर्सिडीज कार" भेट देतात
.
तात्पर्य: मोठे स्वप्न बघा आणि त्यानुसार अंमलबजावणी करा

Friday, September 27, 2019

स्मार्ट सेल्समन


कल्की एक शिस्तबद्ध पद्धतीने काटेकोरपणे जगणारे नेहमीच एका चौकटीत राहणारे एक दिवशी ते बूट खरेदी करण्यासाठी नेहमीप्रमाणे मनात ठरवून एका स्टोअरला भेट देतात कल्की सेल्समनला काळ्या रंगाचा फॉर्मल बूट दाखविण्यास सांगतात. सेल्समन त्यांना विनंती करतो की साहेब आपण आधी आरामात बसा त्यांना आरामदायी आसन देतो आणि त्याच्या गरजेनुसार बुटाची निवड करताना त्यांना थंड पेय ही देतो चांगली सर्विस मिळाल्यामुळे कल्की थोडे खुश होतात सेल्समन त्यांना स्टोअरमधून काही तपकिरी रंगाचे बूट पाहण्याची विनंती करतो पण कल्की त्याला शेवटच्या 20 वर्षांपासून काळ्या रंगाचे सोडून दुसऱ्या रंगाचे बूट कधीच ना वापरल्याचे सांगतात. सेल्समन त्यांना सांगतो की आमच्याजवळ खूप चांगला नवा माल आला आहे ज्याची खूप चांगली विक्री होत आहे तो एकदा बघा आवडला नाहीतर सोडून द्या असे बोलल्यावर कल्की एकदा बघायला तयार होतात

आमच्या कडे ऑफर चालू आहे एकावर एक फ्री त्यामुळे काळ्या बुटावर एकदा हे बूट प्रयत्न करून बघा कल्की ते बूट घेतात सेल्समन त्यांना तपकिरी बुटावर प्यांट, शर्ट, आणि बेल्ट पण विकतो आणि नंतर त्यांना विचारतो साहेब जर आपण याच्यावर मॅचिंग टाय घेतला तर आपली खरेदी पूर्ण होईल. कल्की टाय विकत घेतो आणि त्याला विचारतो जे इतक्या वर्षात झाले नाही ते तू करून दाखवलेस मित्रा तू आहेस तरी कोण? सेल्समन त्यांना उत्तर देतो, साहेब मी या दुकानात टाय चा सेल्समन आहे

तात्पर्य: तुम्ही ग्राहकाला काहीही विकू शकता जर तुम्हाला ग्राहकाची गरज आणि पसंती कळाली

3 x 4 = 13

कल्की नावाचा एक शात्रज्ञ असतो तो एका पेटंट वर काम करत असतो त्याचा शोध जवळपास पूर्ण झालेला असतो पण बरेच दिवस त्याच्यावर काम करून पण त्याला यश मिळत नसते त्याचा धीर हळू हळू सुटायला लागतो मग तो इतर तज्ज्ञांची मदत घ्यायची ठरवतो तो काही तज्ज्ञांची मदत घेतो पण तरीही काही उपयोग होत नाही मग त्याला सोल्युशन बाबा चे नाव कळते पण त्याचा अशा बाबावर विश्वास नसतो पण तरीही बरीच हिम्मत हरल्यामुळे तो बाबाना एकदा भेट देण्याचे ठरवतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो सोल्यूशन बाबाला भेटतो आणि सगळी हकीकत सांगतो त्यावर सोल्यूशन बाबा त्याला 3 x 4 = 13 असे म्हणतात. कल्की विचार करतो की 3 x 4 = 12 होतात मग 3 x 4 = 13 कसे शक्य होईल बाबा असे कसे सांगतात तो खूप विचार करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला 3 x 4 = 13 चा कोणताही मार्ग सापडत नाही.

एके दिवशी त्याला समजले की 3 x 4 = 12 होतात मग 3 x 4 = 13 कसे शक्य होईल म्हणजेच जे लोक 3 x 4 = 12 समजतात ते नेहमीच एका साच्यामध्ये राहून विचार करीत असतात. सोल्यूशन बाबा त्याला समस्या सोडवण्यासाठी साच्याच्या बाहेर विचार करण्याचा सल्ला दिला आणि मग तो आपल्या समस्यांवर काम करायला लागतो म्हणजे आता तो 3 x 4 = 13 मध्ये विचार करण्यास सुरवात करतो आणि तो त्या पेटंटवर यशस्वी संशोधन करतो आणि तो आपल्या जीवनात खूप यशस्वी ठरतो. जे लोक विश्वास ठेवतात की 3 x 4 = 13 अशक्य आहे ते नेहमीच एका साच्यामध्ये राहून विचार करीत असतात

तात्पर्य: 3 x 4 = 13 शक्य आहे

Thursday, September 26, 2019

स्वर्गातील हार



अकबर त्याच्या लहरी स्वभावासाठी प्रसिद्ध होता एक दिवस त्याला अशीच लहर येते आणि तो दरबारात जाहीर करतो मला स्वर्गातील हार घालायचा आहे सगळे आश्चर्यचकित होतात स्वर्गातील हार कोण आणू शकेल बिरबल हे आव्हान स्वीकारतो आणि काहीही दिवसांनी अकबराकडे एक दोरी घेऊन येतो आणि त्याला सांगतो महाराज मी स्वर्गातील हार घेऊन आलो आहे पण याची खासियत ही आहे की हा हार फक्त पुण्यवान लोकांनाच दिसतो आणि पापी लोकांना हि दोरी दिसते अकबराला दि दोरी दिसत असते पण तो सांगत नाही कारण बिरबलाच्या म्हणण्यानुसार तो पापी ठरला असता मग तो विचार करतो की आपण दरबारात जाऊन याची परीक्षा घेऊ पण दरबारात पण सारखेच होते सगळ्यांना ती दोरी दिसत असते पण कोणाचीच खरं सांगायची धास्ती होत नव्हती आणि सगळे त्याला हार समजून शांत बसतात

तात्पर्यः नेहमी असेच होते सत्याला दाबून टाकायचा प्रयत्न केले जातात