नास्तिक
एक नास्तिक हा अस्थिकांपेक्षा देवाला अधिक प्रिय असतो
कारण देवाकडे तो कधीच काही मागत नसतो
देवाला हार फुलांची लाच देऊन कधी फळाची अपेक्षा धरीत नसतो
आणि म्हनूनच देवाला अस्थिकांपेक्षा एक नास्तिकच अधिक प्रिय असतो
एक नास्तिक देव दर्शनासाठी कधी कुठल्या रांगेत थांबत नसतो
कारण रांगेत थांबून त्याला (लवकर) देव दर्शनासाठी कुणालाही शिव्याशाप द्यायचा नसतो
देवालाही भक्ताच्या असल्या वागण्याचा कंटाळा आलेला असतो
आणि म्हनूनच देवाला असल्या भक्तापेक्षा एक नास्तिकच अधिक प्रिय असतो
एक नास्तिक हा आपल्या विश्वासावर नेहमीच ठाम असतो
पण आस्तिक हा वेळोवेळी देवाला त्याच्या अस्तित्वाचे प्रमाण मागत असतो
देवालाही प्रत्येक वेळेस प्रत्यय देण्याचा कंटाळा आलेला असतो
आणि म्हनूनच देवाला असल्या भक्तापेक्षा एक नास्तिकच अधिक प्रिय असतो
एक नास्तिक हा देवाला कधीच कुठल्या तर्हेने त्रास देत नसतो
तर आस्तिक हा ढोल , तश्या , बाज्या , पूजे मधून त्याला कधीच शांत बसू देत नसतो
देवालाही आता क्षणिक शांतीचा मोह झालेला असतो
म्हनून तो देऊळ सोडून दूर जंगलात समाधी बसलेला दिसतो
No comments:
Post a Comment