Monday, April 22, 2019

Goal - एक लक्ष्य


नेक्टर नावाची एक कंपनी होती . तिच्या मालकाचे नाव मार्क होते . मार्क खूप टेन्शन मध्ये होता कारण त्याची कंपनी 3 महिन्या मध्ये बंद पडणार होती. त्याला काय करावे सुचत नव्हते, त्यामुळे तो अनेकांचे सल्ले घेत होता मित्र, नातेवाईक, एक्सपर्टस त्याला जे योग्य वाटत ताच्या कडून तो सल्ला घ्यायचा प्रयत्न करत होता पण काही फरक पडत नव्हता त्याला एकाने सांगितले की तू सोलुशन बाबाचा एकदा सल्ला घेऊन बघ काही फायदा झाला तर चांगलेच नाही आणि जर तुला योग्य नाही वाटले तर सोडून दे. 

एकदा प्रयत्न करायला काही नुकसान नाही म्हणून मार्क त्याला भेटायला जातो आणि सोलुशन बाबांना सगळी हकीकत सांगतो त्यांतर बाबा सांगतात की तुझी कंपनी प्रॉफिट मध्ये जावी या साठी तुमच्या कंपनीने काय गोल सेट केला आहे त्यावर मार्क म्ह्णतो की आम्ही या वर्षी कामगार कमी करणार आहोत, उत्पादन वाढवणार आहोत, मार्केटिंग-सेल्स वाढवणार आहोत आणि बरेच काही करणार आहे ज्यामुळे आम्हाला चांगला प्रॉफिट होणार आहे त्यावर बाबा त्याला उत्तर देतात की तुला खात्री आहे का हे जर सगळे तू केले तर तुझ्या कंपनी ला फायदा होईल त्यावर मार्क उत्तर देतो की मला आशा आहे की यामुळे नुकसान भरून कंपनी ला चांगला प्रॉफिट होईल . त्यावर बाबा म्हणतात की 

जे तू सांगितले त्यातले काही पॉईंट्स मी घेतो एक पॉईंट होता की जर उत्पादनात वाढ केली आणि सेल्स मध्ये लॉस होत असेल काही फायदा होईल का आणि कामगार कमी करून कंपनीत फायदा होईल का नाही मग कंपनी ला फायदा कसा होईल आणि तिसरा पॉईंट मार्केटिंग आणि सेल्स वाढवला पण सेल्स कॉस्ट पेक्षा अधिक खर्च झाला ज्यामुळे शेवटी नुकसान होणार असेल तर मार्केटिंग करून काही उपयोग होणार नाही मग मार्क त्यांना म्हणतो मग मी काय केले पाहिजे असा तुमचा सल्ला आहे बाबा त्याला म्हणतात की तुझ्या प्रश्नात उत्तर लपलेले आहे ते शेधण्याचा प्रयत्न कर मग तुला यश मिळेल 

मार्क तेथून निघून परत कंपनी मध्ये येतो आणि कंपनी मध्ये आल्यावर तो सगळ्या मॅनेजर लोंकाना मीटिंग रूम मध्ये बोलवतो आणि त्यांना कंपनी बद्दल सगळे खरे सांगतो की 3 महिन्यात जर कंपनी ला प्रॉफिट नाही झाला तर कंपनी बंद करावी लागेल तो सर्व मॅनेजर बरोबर डिस्कशन करतो पण त्याला काही प्रॉपर उत्तर मिळत नाही मग तो विचार करितो की माझ्या कडे एवढे हुशार आयआयटि आयआयम टॉपर मॅनेजर आहेत तरी पण माझी कंपनी का नुकसानीत आहे मग तो विचार करतो की वर्षा आधी माझी कंपनी खूप चांगली होती माझे ग्राहक, कामगार सगळे खूष होते माझी कंपनी प्रॉफिट मध्ये चालली होती मग अचानक असे का व्हावे की मला कंपनी बंद करावी अशी वेळ यावी कंपनी मध्ये HR, Marketing and Sales, Technical, Account असे बरेच डिपार्टमेंट आहेत सतत आणि नीट विचार केल्यावर त्याचा लक्षात येते की सगळ्याच डिपार्टमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे त्याला काय करावे काही सुचत नाही म्हणून तो परत बाबा कडे जायचे ठरवतो तो आणि परत बाबा कडे जातो त्यांना म्हणतो को बाबा मी तुमच्या बोलण्यावर खूप विचार केला पण मला काही उपाय सापडला नाही आणि मी माझ्या मॅनेजर्स बरोबर पण बोललो पण मला काही सोलुशन मिळाले नाही आता तुम्हीच मला मदत करा त्यावर बाबा त्याला म्हणतात मी तुला सांगितले होते की तुझ्या प्रश्नात तुझे उत्तर लपलेले आहे तुझ्या प्रश्न होता की माझ्या कंपनी कंपनी ला प्रॉफिट मिळण्यात साठी मला गोल काय ठरवलं पाहिजे याचे उत्तर आहे की “प्रॉफिटहाच तुमचा गोल असला पाहिजे” 

कारण तू जे काही सगळे पर्याय सांगितले ते हा गोल मिळवण्याचे मार्ग आहेत गोल नाही त्यामुळे तो तुला गोल वर लक्ष केंद्रित करून तुला या सगळ्या पर्यायांचा विचार केले पाहिजे तू जर चुकीचा गोल निश्चित केला तर सगळे पर्याय वापरून पण तुझ्या कंपनी प्रॉफिट होणार नाही .हे ऐकल्यावर मार्क ला त्याची चूक लक्षात येते आणि तो बाबांचा निरोप घेऊन परत कंपनी मध्ये येतो परत कंपनी मध्ये आल्यावर तो सगळ्या मॅनेजर बरोबर मीटिंग घेतो आणि सगळ्यांना ती सगळी हकीकत सांगतो आणि त्याना हे हीं सांगतो को आता आपल्या सगळ्यांचा गोल एकच हे की “प्रॉफिट ”. आपल्याला सगळ्या डिपार्टमेंट मध्ये प्रॉब्लेम आहेत पण आपण ते एक एक डिपार्टमेंट विचार करून आपण ते सगळे प्रॉब्लेम दुरुस्त करू आणि आपली कंपनी परत प्रॉफिट मध्ये आणू 

मार्क सगळ्या आधी टेक्निकल डिपार्टमेंट मधला प्रॉब्लेम सोडवण्याबद्दल ठरवतो आणि टेक्निकल मधल्या सगळ्या कामगारांना बोलवतो आणि त्यांच्या बरोबर चर्चा करतो आणि प्रॉब्लेम काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करतो मग तो त्यांना सांगतो की आज पासून 3 दिवस मी तुमच्या बरोबर राहीन आणि तुमचे प्रॉब्लेम समजून ते सोडवायचा प्रयत्न करीन मग नंतरचे 3 दिवस तो त्यांच्या बरोबर घालवतो आणि परत मीटिंग बोलवतो मार्क त्या टीम ला सांगतो की मी तुमच्या बरोबर 3 दिवस घालवले त्यामुळे मला एक लक्षात आले की तुम्ही चांगले काम करता पण तुमच्या मध्ये टीम वर्क नाही म्हणजे तुमच्या मधली काही मुले खूप फास्ट आहे पण काही खूप स्लोव आहेत त्यामुळे एक दुसऱ्या वर अवलंबून असलेले काम मागे पडत आहे याचे एक कारण कोऑर्डिनेशन दुसरे कारण आहे की प्रॉपर डेलिगेशन म्हणजे जर एखादे काम खूप मागे आहे तर ते हुशार मुलाने घ्यावे म्हणजे त्या साठी कमी वेळ लागेल आणि सगळ्यांनी राहिलेले काम वाटून घ्यावे मग परत 2 दिवसांनी परत मीटिंग घेऊन आपण परत यावर विचार करू 2 दिवसांनी मीटिंग घेऊन पहिले तर हे लक्षात येते कि प्रोडूक्टिव्हिटी 80% वाढली होते मग अजून दोन तीन मीटिंग घेतल्यावर मार्क टेक्निकल टीम चे बऱ्यापैकी प्रॉब्लेम बऱ्या पैकी सोडवू शकतो आणि तसेच दुसऱ्या टीम चे पण एक एक टीम बरोबर काम करून 3 महिन्यामध्ये सगळ्या कंपनी चे प्रॉब्लेम सोडवून तो कंपनी परत पहिल्याच्या पातळीवर आणतो 

No comments:

Post a Comment