Thursday, May 2, 2019

DESERT - वाळवंट



एक अथांग वाळवंट असते ज्याचा शेवट आज पर्यंत कोणालाही सापडलेला नसतो त्यामुळे सगळ्यामध्ये एक उत्सुकता असते की नेमके हे वाळवंट किती मोठे आहे १० लोक असे ठरवतात की आपण याचा शेवट शोधून काढू हा विचार करून ते १० लोक या वाळवंटावर चालायला लागतात. थोडे पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की हे वाळवंट बरेच मोठे असले पाहिजे कारण बऱ्याच जणांनी प्रयत्न केले पण आज पर्यंत त्याचा शेवट कोणीच शोधू शकले नाही पण ते ठरवतात की आपण हिम्मत हरायची नाही आणि याचा शेवट शोधून काढायचा ते परत चालू लागतात मध्ये एक झाड किंवा पक्षी किंवा प्राणी काहीच लागत नाही त्या सगळ्यांना बरेच आश्चर्य वाटते की असे कसे घडले असेल की आपल्या रस्त्यात आपल्याला काहीच लागले नाही पण ते तरीही पुढे चालू लागतात परत काही अंतर गेल्यावर ते परत विश्रांती घ्यायचे ठरवतात या वेळेस एक जण विचार करतो की आपल्या जवळचे पाणी बरेच कमी झाले आहे पुढे किती चालावे लागणार हे माहित नाही आता कमीत कमी एवढे माहित आहे की जेवढे पण आहे ताच्या जोरावर आपण परत पूर्वीच्या जागी पोहोचू शकतो हा विचार करून त्यातला एक जण परत माघारी फिरतो आता 10 पैकी 9 जणंच राहतात


9 जण परत पुढे चालायला लागतात आता त्यांना काही प्राणी मरून पडलेले दिसतात. यांची अवस्था खूपच वाईट दिसते. नक्कीच ते पाणी मिळालेलं नाही म्हणून मेलेले दिसतात. पण आपण काही हिम्मत सोडायची नाही असे ते ठरवतात आणि परत पुढे चालायला लागतात . थोडे पुढे गेल्यावर त्यांना झोपडी दिसते मग ते तिथे थोड्या वेळ आराम करायचे म्हणून थांबतात . तिथे त्यांना एक चिट्टी दिसते त्यावर लिहिलेले असते की ” मला माहित आहे की तुम्ही इथं पर्यंत मोठ्या मुश्किलीने पोहचलेले असणार त्यामुळे तुमच्या सोयीसाठी मी हि झोपडी बांधून ठेवली आहे जरी मी तुम्हाला पानी देऊ शकत नसलो तरी कमीत कमी पुढे जाण्यासाठी आशा ठेवून जात आहे ”हे वाचल्यावर 8 जण पुढे जाण्याचे ठरवतात पण एक जण तिथेच थांबण्याचे ठरवतो.


8 जण पुढे चालायला निघत . आता रस्त्यात त्यांना काही प्राणी मेलेले दिसत असतात तरीही आपणं हिम्मत सोडायची नाही असे ते ठरवतात आणि पुढे चालत राहतात थोडे पुढे गेल्यावर त्यांना परत एक झोपडी लागते ते परत त्या झोपडीत विश्रांती साठी थांबतात येथेही त्यांना एक चिट्टी सापडते ” तुम्ही येथ पर्यंत याल अशी आशा होती इथं पर्यंत येईस्तोवर तुमच्या जवळचे बऱ्यापैकी अन्न आणि पाणी संपलेले असेल त्यामुळे अन्न आणि पाणी तुमच्या साठी सोडून जात आहे ” हे वाचून सगळ्यांना खूप आनंद होतो बऱ्याच वेळाने काही तरी खायला मिळाले म्हणून सगळे खूप आनंदित होतात मग ते ठेवलेले पदार्थ खाऊन आणि पाणी पिऊन ते पुढे जायचे ठरवतात पण त्यातला एक तिथे थांबण्याचे ठरवतो


7 जण पुढे जायला निघतात . या वेळेस त्यांना वाटत असते की आता लवकर शेवट यावा सगळे मनापासून हाच विचार करत असतात आणि पुढे पुढे चालत असतात पण शेवट काही दिसत नाहीच पण कोठे तरी एक आशा लपलेली असते आणि तेच पुढे चालण्याची शक्ती देत असते थोड्या पुढे गेल्यावर त्यांना परत एक झोपडी दिसते आता त्यांच्या लक्षात येते की हि त्याच माणसांनी बांधलेली असते ज्याने मागच्या झोपडी पण बांधलेली असते आत गेल्यावर परत त्यांना एक चिट्टी दिसते ” आता माझ्या जवळचे पाणी पण संपत आले आहे माझ्या जवळ जे काही पाणी आहे ते इथे ठेवलं आहे अशी आशा करतो कि तुम्हाला पुरेल आणि तुमचा पुढचाही प्रवास सुखाचा व्हावा हीच इच्छा ” हे वाचून आणि विश्रांती घेऊन त्यातले फक्त 6 जण पुढे जायला निघतात .


6 जण पुढे जायला निघतात आता त्याना बऱ्याच अडचणी येतात पण ते पुढे जायचे ठरवतात पण यावेळेस बरेच चालल्या नंतरही झोपडी लागत नाही आता सगळ्यांची आशा तुटायला लागते मोठ्या मुश्किलीने ते चालत असतात पण त्यातल्या बऱ्याच जणांच्या आशा संपलेल्या असतात आता काय करावे हे हि सुचत नसते पण चालण्या शिवाय गत्यंतर नसते ते चालत असतात रस्त्यात प्राणी आणि पक्षी पण मेलेले दिसत नाही त्यामुळे बऱ्याच जणांचा धीर सुटत चाललेला असतो थोड्या पुढे गेल्यावर त्यातले 2 जण जीव सोडून जातात . आता त्यांच्यात फक्त 3 लोक राहतात


3 जण पुढे चालायला लागतात . ते ठरवतात की आता काही झाले तरी आपण हिम्मत सोडायची नाही हा विचार करून ते पुढे चालू लागतात बऱ्याच पुढं येऊन पण काहीच दिसत नाही अधे मध्ये धीर सुटत असतो पण त्यांच्या जवळ काही पर्याय नसतो त्यामुळे पॉसिटीव्ह थिंकिंग हा त्यांच्या समोर पर्याय असतो ते चालत राहतात पण पुढे काही दिसत नाही त्यामुळे आता त्यांचा धीर अधिकच सुटतो आणि त्यालाला एक मरण पावतो आता फक्त दोघेच राहतात त्यातला एक म्हणतो की आपण खूप लांब आलेलो आहोत आता इथून फक्त तू पुढे जा म्हणजे इथं पर्यंत जर कोणी आला तर मी त्याला आशा देईन की एक जण पुढे गेला आहे आणि जर तुला शेवट सापडला तर तू परत येशील जरी शेवट नाही सापडला तरी दुसऱ्यासाठी मी मार्गदर्शक ठरेल माझ्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहे आता पुढे तू एकटाच जा


मग तो एकटाच पुढे जायला निघतो . आता त्याच्या लक्षात आलेले असते की आपल्या बरोबर कोणी नाही त्यामुळे आपल्याला हिम्मत सोडून चालणार नाही तो धीर सोडायचा नाही हे ठरवून पाढे चालू लागतो बरेच चालल्यावर पण काहीच दिसत नाही पण तो ठरवतो की आपण धीर सोडायचा नाही अजून थोडा पुढे गेल्यावर एक झोपडी दिसते पण या वेळेस ना चिट्टी असते ना पाणी असते आता मात्र त्याची हिम्मत सुटायला लागते काय करावे त्याला सुचत नाही त्याचे पाय पुढे चालायला धजावत नाही पण इथे पण आपल्याला कोणी पाणी आणून देणार नाही या एकाच विचारावर तो परत पुढे जायचे ठरवतो तो चालायला निघतो बरेच अंतर चालल्यावर देखील काही लागत नाही आणि दिसत नाही आता मात्र त्याचा धीर पूर्णपणे सुटतो एवढ्यात त्याला ला झोपडी दिसते पण तिथे काही नसेल तर काय करावे त्याला काही सुचत नाही त्याच्या डोळ्यात पाणी येते आणि तो देवाला विनवतो की देवा काही करून त्या झोपडी मध्ये पाणी राहू दे .


तो त्या झोपडीत जातो पण काहीच सापडत नाही आता त्याचा धीर पण पूर्णपणे सुटतो तो खाली बसतो आणि अचानक त्याचा हाताला काही तरी लागते ती एक चिट्टी असते “ मित्रा आता माझ्या जवळ एकाच बाटली पाणी होते पण मला वाटेतले की माया पेक्षा कोणी तरी येईल जो जगायची आशा सोडून आलेला असेल आणि त्याला माझ्या पेक्षा पाण्याची जास्त गरज असेल त्यामुळे मी हि बाटली तुझ्या साठी ठेऊन जात आहे जर नशिबाने साथ दिली तर मी तुला पुढे भेटीन आणि पुढच्या प्रवासा साठी माझ्या तुला शुभेच्छा आहे ” त्याच्या डोळ्यात खाडकन पाणी येते आणि तो देवाचे आणि त्याचे आभार मानतो . पण या वेळेस तो हि खूपकामी पाणी पितो आणि ती चिट्टी आणि ते पाणी तिथे ठेऊन परत पुढच्या प्रवासाला निघतो .


मित्रानो हे वाळवंट म्हणजे आपले आयुष्य आहे आपल्याला माहित नसते की याचा शेवट कुठे आहे आपल्या बरोबर काही लोक प्रवास करतात आणि त्यातले काहीजण प्रवासात मागे सुटत जातात आपण चालत राहतो बरेच चांगले वाईट अनुभव आपल्याला येतात पण आपण चालायचे थांबत नाही थोड्या अंतरावर आपला हि प्रवास संपतो तरी आपल्या बरोबर जे आले होते ते पुढयाच्या प्रवासाला निघतात आणि असेच कालचक्र चालू राहते .आणि वाळवंटाचा अंत कोणालाच सापडत नाही


लेखक


डॉ मकरंद कुलकर्णी













No comments:

Post a Comment